आपण बोलतो ते दुसऱ्याला कशाला समजायला हवे? आणि लिहितो ते? अजिबात गरज नाही. ज्याला जी अक्षरे ज्या क्रमाने आणि ज्या सुरात उच्चारायची आहेत ती त्याने तोंडातून बाहेर फेकावीत. आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा अजिबात संकोच होऊ देऊ नये. आपले बोलणे माणसांना नाही समजले तरी एखाद्या जनावराला नक्की समजेल, अशी आशा मनात धरून खुशाल बडबडावे.
वादपटूंशी या बाबतीत शंभरटक्के सहमत.