कुरकुरीत छानच लागतो हा डोसा. असेच काकडीचे थालीपीठ करता येते. काकडी किसण्याऐवजी कोशिंबीरीसाठी कोचतो तशी कोचून घ्यावी, मग तांदळाचे पीठ आणि वरचे साहित्य घालून थालीपीठाला भिजवतात तसे पीठ भिजवायचे. यात बारीक चिरलेला कांदाही चांगला लागतो.