सुरेख कथा. 'निळ्या काचेच्या पेना'शी हिची तुलना अनिवार्य आहे पण ही कथा निश्चितच वेगळी आहे. यातला कौस्तुभ हा जरासा मोठा झालेला निखिल वाटतो.

ही कथा कोकणात न घडता खानदेशात घडते त्याप्रमाणे बोलीभाषेसकट दैनंदिन आयुष्यातले बारकावे मस्त टिपले आहेत. लहान मुलाचे भावविश्व चितारण्याची हातोटी विलक्षण आहे. समीरदादा आणि ज्योत्स्नाताई यांची उलगडत जाणारी भावकथा लहान मुलाच्या दृष्टीतून सुरेख दाखवली आहे. "दोघेही फुलदाणीतल्या फुलांसारखे शेजारी शेजारी पण गप्प गप्प बसले", "माझे राज्य असते तर तिला राणीची मोलकरीण करून भांडी घासायला बसवले असते." इत्यादी वाक्यांनी कथेची रंगत वाढली आहे. या मालिकेतल्या आणखीही कथा वाचायला आवडतील.

बरेचसे असेच  सुखान्त/धक्का अपेक्षित नव्हता. म्हणजे नसता तरी चालून गेले असते असे वाटले. पावलेकाकूंचे वेगवेगळे 'राजू' मजेदार. ह्याचे एक कारण म्हणजे रशदीच्या एका कादंबरीत (मूर्ज़ लास्ट साय बहुतेक) केरळातले वेगवेगळ्या लेनिनांचा उल्लेख होता. काही बुटके, काही तिरळे, काही गोरे, वगैरे वगैरे. त्यांची आठवण झाली.  पण 'टिंडा' हा शब्द उत्तरेत वापरतात असे वाटते. सिंधी कॉलनीतून आला असावा. विदर्भात ह्याला 'ढेमसे' म्हणतात.  पुण्यात काय म्हणतात, हे जाणून घ्यायचे आहे.