अभिजाततेचे संवर्धन, संगोपन करणे ही कलाकारांची व रसिकांची संयुक्त जबाबदारी आहे.
भौगोलिक, सामाजिक, आर्थिक बदल याची सतत जाणीव ठेवणे आणि त्यानुसार जीवनपद्धतीत बदल अंमलात आणणे हे ही तेवढेच निकडीचे पण स्पर्धात्मक झाले आहे.
म्हणूनच सवाई सारखे कार्यक्रम अजूनही चालू आहेत, त्याचबरोबर शास्त्रीय संगीतातले नामांकित कलावंत 'फ्युजन' आविष्कारही दाखवू लागले आहेत ज्याला रसिकांचा उत्तम प्रतिसादही मिळत आहे.
सुसुत्र बांधणी केलेला लेखबंध सादर केल्याबद्दल धन्यवाद!