पुरीच्या देवळाचे यथार्थ वर्णन केले आहे. डोक्यावर काठी मारणारे एका हाताने काठी मारतात आणि त्याचवेळी दुसरा हात दक्षिणा/ बक्षीस (त्यांनी आपले पापक्षालन केले म्हणून!) यासाठी पुढे करतात. पण पुरीला मिळणारा 'सूखा भोग'(कोरडा प्रसाद) छान असतो. पाकातले चिरोटे असतात. पण टिकण्याच्या दृष्टीने पक्का पाक करून जरा कडक केलेले असतात. तो तुम्हाला मिळालेला दिसत नाही! त्याची दुकाने मंदिराच्या बाहेरही असतात.
तसेच तुम्ही पुरीचा समुद्रकिनारा पाहिला की नाही? तो पाहण्यासारखा आहे.

(मध्यंतरी बरेच दिवस माझा जालाशी संपर्क नव्हता म्हणून प्रतिसाद द्यायला उशीर झाला.)