इथेही 'पुरावा' मागणारे आहेतच!
मला कधी कधी या पुरावा मागणारांची कीव येते, त्यांना प्रत्येक गोष्ट लॉजिकली लागते.
अगदी सहमत!
प्रत्येक भारतीय भाषेला संस्कृत जवळची भाषा आहे.
फक्त भारतीय भाषाच नव्हे तर जगातील सर्वच भाषांना संस्कृत ही जवळची भाषा आहे. ऍरगॉनिज ह्या स्पेनमधील पहाडी प्रांतात बोलल्या जाणाऱ्या भाषेचे मूळ संस्कृतातच आहे. एवढेच नव्हे तर ऍमराइट ह्या इ. स. पूर्व २००० च्या सुमारास (बहुतेक ब्राँझयुगाचा काळ) जॉर्डन, सिरिया, लेबनॉन वगैरे प्रांतात असणाऱ्या ऍमराइट ह्याच नावाच्या जमातीत बोलल्या जाणाऱ्या भाषेचे व्याकरण हे पाणिनीय व्याकरणाप्रमाणेच सूत्रबद्ध आहे असे आम्ही ऐकले आहे. त्यातील संधीबाबतची काही सूत्रे अगदी 'एचोऽयवायावः'सारखीच आहेत असे ऐकले आहे.