हे शब्द मराठीत लिहिताना व उच्चारताना भिन्न असतात.

असे बरेच शब्द आपणा सर्वांना माहित आहेतच.

शुद्धलेखन संदर्भात म. टा. सारख्या वृत्तपत्रासुद्धा लेखमाला आल्या होत्या.

संबंधित जाणकार, तज्ञांना (हा शब्द ही लिहिताना वेगळ्या पद्धतीने लिहायचा असतो म्हणे) एक सुचवावे वाटते.

इटालियन भाषेची लिपी रोमन, आणि बहुतांश लिखाण उच्चारानुसार. स्कॉटिशही तसेच असावे असा अंदाज.

चु. भु. द्या. घ्या.

अर्थात सर्व भाषेत असे विरोधाभास असतातच. उदा. 'सायकॉलॉजी' हा शब्द इंग्रजीत लिहिताना वेगळा असतो.

थोडक्यात मला एवढेच म्हणायचे आहे, बदल होणे ही स्थिर व गरजेची बाब आहे.

आणि त्यानुसार मराठी भाषेचा गोडवा लिखित व उच्चारानुसार (आणखी गोंधळ न वाढविता) कसा वृद्धिंगत करता येईल हे तज्ञांनी योग्य तऱ्हेने ठरवावे ही नम्र विनंती!!!