स्कॉटिश नावाची वेगळी भाषा आहे ही माहिती मला नवीन आहे. माझी कल्पना होती की स्कॉटलंडमध्ये इंग्रजीच बोलतात, फक्त त्यांचे उच्चार आणि शब्दांचे अर्थ काहीसे वेगळे असू शकतात. चांगल्या इंग्रजी शब्दकोशात अनेक शब्द स्कॉटिश म्हणून दिले असतात. उदाहरणार्थ INGINE. स्कॉट्स किंवा स्कॉटिश नावाची इंग्रजीची एक बोलीभाषा स्कॉटलंडमधील मैदानी प्रदेशातील अल्पसंख्य लोक बोलतात, अशी माझी कल्पना होती.(चू.भू.द्या̱̱̱̱̱̱̱.घ्या.)
फ्रेंच किंवा मॉरिशन भाषेत बहुधा एकाही शब्दाचे स्पेलिंग उच्चारानुसारी नसते.
मराठीमध्ये क-च-ट=त-प वर्गात नसलेले य, व, र, ल, स, श, ह या अक्षरांअगोदर अनुस्वार आला तर त्या अनुस्वाराचा उच्चार करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ती अशीः संयम=सञ्यम=सैंयम; संवाद=सौंवाद; संरक्षण=सौंरक्षण=संव्रक्षण; संलग्न=सौंलग्न; संसार=सौंसार; संशय=सौंशय; सिंह=सिंव्ह. ही पद्धत अधिकृत आहे, त्यामुळे सिंह शब्दाचा सिंव्ह हा अधिकृत उच्चार आहे हे गृहीत मनात धरावे. हिंदीत मात्र हंसचा उच्चार हन्स, डान्सचे लिखाण डांस, आणि सिंह चा उच्चार सिं ह असा होतो. तेव्हा हिन्दी बरोबर आणि मराठी चूक ही कल्पना मनातून काढून टाकावी.