कथा वाचायला फार आवडली. वाभरट, धोदाणा हे हल्ली कानावर न पडणारे शब्द वाचून छान वाटले. तसेच चची, डमैची भाषा इ. बारकावे शाळकरी मुलाचे नेमके वर्णन करतात. प्रकाश नारायण संतांच्या लंपनची आणि मिलिंद बोकील यांच्या 'शाळा'ची आठवण झाली.
चित्त म्हणतात तसे सुखांत/धक्का अपेक्षित नव्हता. म्हणजे नसता तरी चालून गेले असते. असेच मलाही वाटते. खरे तर काहीही कथानक नसताना फक्त कौस्तुभच्या उन्हाळ्याच्या सुट्टीबद्दल वाचायलाही मला आवडले असते. तुमची शैलीच तशी आहे!