मला कधी कधी या पुरावा मागणारांची कीव येते, त्यांना प्रत्येक गोष्ट लॉजिकली लागते.
पुरावा मागणे आणि प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून बघणे योग्यच आहे. ह्यात कीव येण्यासारखे काही नाही. अर्थात कोणी कोणाची कीव करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणा.
(अगदी झोंबणारे उदाहरण द्यायचे झाल्यास, आई ही वस्तुस्थिती असते तर बाप
हा विश्वास! तिथे पुरावा शोधत नाहीत.तशी पद्धत नाही, ज्याला हौस आहे
त्याने खुशाल DNA तपासण्या कराव्यात.)
प्राचीन भारतीय संस्कृती,
रीती-रिवाज , भाषा - परंपरा, जीवन पद्धत हे सगळं वाईट्ट, आणि जे काही
तिकडून आले ते ते सर्व चांगले असे म्हणण्याची सध्या फॅशनच आहे, आणि असे
वागणे- बोलणे हे 'पोलिटिकली करेक्ट' असते.
माझ्या मते वरील विधाने म्हणजे भाषणबाजी आहे आणि तुम्ही दिलेले उदाहरण झोंबण्यासारखे नाही.
ती राष्ट्रभाषा म्हणून सार्वत्रिक
मान्य होऊ शकेल, त्याने राष्ट्रीय एकात्मतेला हातभारच लागेल .कदाचित भाषिक
वाद कमी होतील. संस्कृत- गीर्वाण वाणी ही आसेतुहिमाचल पसरलेल्या
भारतीयांचे सांस्कृतिक प्रतिक आहे.
इतकी शतके, सहस्रके संस्कृतने राष्ट्रीय एकात्मतेला कसला डोंबलाचा हातभार लावला ते सांगावे. मूड झाल्यास पुरावा द्या. ह्यात 'डीएनए' पुरावा गृहीत धरला आहेच. व्यापार-उदिमाची भाषा एकात्मतेतला हातभार लावते असे वाटते. म्हणून संस्कृतमधून ट्रेडिंग व्हावे ही प्रदीप ह्यांचे मत पटायला हरकत नाही.
पण लक्षात कोण घेतो??? हज यात्रेला सवलत देणाऱ्या माय-बाप ( आपले ते
कार्टे आणि दुसऱ्याच्या बाब्याचे लाड करणारे माय-बाप!) सरकारला त्यात
धार्मिक तेढ दिसेल, त्यामुळे जोपर्यत अमेरिका- युरोप मधून संस्कृत पंडित
येत नाहीत तोपर्यंत आपण संस्कृत वाचावी म्हणून काहीही करणार नाही........!
पुन्हा भाषणबाजी संस्कृतसाठी काम करणार्या अनेक सरकारी आणि सरकारी अनुदान घेणार्या गैर-सरकारी संस्था आहेत. संस्कृत विद्यापीठे आहेत, असे वाटते.
शिकण्यासाठी-
शक्यतेवढा प्रयत्न करावा, ज्याला
मराठी चांगली येते त्याला संस्कृत यायला काहीच प्रत्यवाय नसवा, प्रयत्न
केल्यास बऱ्यापैकी यश येते हा स्वानुभव आहे, संस्कृत शिकवणारी संस्था - " अक्षरम" दुवा क्र. १
हे पुरेपूर पटले. संकेतस्थळ आवडले. मनःपूर्वक धन्यवाद.
असो. संस्कृतचे माहीत नाही. पण मायमराठीचे आधी जतन करायला हवी, वाचवायला हवी हे मात्र खरे.