मूळ प्रतिसाद असा वापर योग्य की अयोग्य, असा प्रश्न  विचारणारा आहे.

'मूळ प्रतिसाद' म्हणून उल्लेखलेला प्रतिसाद कोणता ते समजले नाही. त्यामुळे योग्य की अयोग्य असा प्रश्न सापडला नाही.

आदरार्थी 'आपण' चा प्रयोग फक्त  ‌औपचारिक बोलताना करावा लागतो.  अशी वेळ फक्त समारंभात अनोळखी किंवा अत्यादरणीय पाहुण्यांच्या आगत स्वागत प्रसंगीच करणे शोभून दिसते. एरवी 'आपण'चा वापर कुत्सितार्थे समजला जातो.  त्यामुळे आपण‌ऐवजी तुम्ही हे सरसकट झालेले नाही आणि असे होऊ पाहत असेल तर ते अयोग्य आहे.