नुकतेच वृत्तपत्रात (नेमका संदर्भ आठवत नाही) आप्पा बळवंत चौकात एक दुकान सुरू झाल्याचे वाचले आहे. या दुकानात म्हणे ग्राहक स्वतः पुस्तकांपर्यंत जाऊ शकतो, शिवाय पुस्तक तेथेच बसून वाचता (? ) येते. हवी असल्यास छायाप्रतही मिळण्याची सोय आहे. हे दुकान पाटील एंटरप्राईजेस या नावाने रतन टॉकीज जवळ आहे असे वाचल्याचे आठवत होते. या आठवणीवर पुरता चौक फिरलो, पण दुकानाचा पत्ता सापडेना. जर कोणास या दुकानाचा शोध लागलाच तर कृपया पत्ता मिळावा.
पाटणकर साहेब, मराठवाडा मित्र मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे (तेथे जाणारा रस्ता सुरू होतो) किंवा कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या अलिकडे आहे, तोच हा वडाचा स्टॉप का? तसे असेल तर विठ्ठल प्लाझा शोधणे अवघड नाही. माहितीबद्दल धन्यवाद.
अवधूत