प्राचीन भारतात संस्कृत ही बोली भाषा म्हणून वापरत असत की नाही हा थोडासा
वादाचा मुद्दा होऊ शकतो. कारण जरी अनेक धार्मिक/वैज्ञानिक ग्रंथ संस्कृतात
असले तरी असे आढळून येते की अनेक संस्कृत नाटकांमध्ये संस्कृतासोबत
प्राकृतदेखील वापरली जाते. एक असे निरीक्षण आहे की अनेक नाटकांमध्ये
ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्यांच्या तोंडी संस्कृत आणि स्त्रिया व
शूद्रांच्या तोंडी प्राकृत असायची. (किंबहुना एका नाट्यशास्त्रकाराच्या
नाट्यशास्त्रात तसा नियमच होता.
विश्वनाथ खैरे ह्यांचा संस्कृत आणि प्राकृत हा लेख वाचावा.
अवांतर:
'जावा'मध्ये आढळणारी OOP (Object Oriented Programming) ही संकल्पना संस्कृतच नव्हे तर इतर कोणत्याही नैसर्गिक भाषेत येत नाही.
'जावा'मध्ये आढळणारी पेक्षा जावाचा अविभाज्य (सीप्लसप्लसप्रमाणेच) अंग असलेली संकल्पना. आढळण्यात दुय्यमपणा आला, असे वाटते. जाणूनबुजून ह्या गोष्टी समाविष्ट केल्या ह्या भाषांत समाविष्ट केल्या आहेत, असे माझ्या तुटपुंज्या अभ्यासावरून आणि स्मरणशक्तीवरून वाटते. पॉलिमॉर्फिझम, मेथड ओवररायडिंग, ऑपरेटर ओवरलोडिंग ह्या ओओपी च्या 'संस्कृती'ला लागू होतील. संस्कृती म्हणजे काय ह्या चर्चेत टाकावेसे वाटले होते. असो.