-
-
-
संस्कृत आणि संगणक ह्या दोन्ही गोष्टी न जाणणाऱ्या लोकांनी असा गैरसमज पसरवून ठेवला आहे. थोडासा विचार केला तरी एक गोष्ट लक्षात यावी की संगणकाचे काम हे 'बायनरी'मध्ये चालते. त्याच्याशी संस्कृतच काय पण इंग्लिश, फ्रेंच किंवा ऍरगॉनिज ह्या भाषांचादेखील संबंध नाही. ज्याला 'हाय लेवल लँग्विज' म्हणतात त्या जावा, सी++,. नेट वगैरेंचादेखील जेव्हा विचार करतो तेव्हा त्यादेखील जर्मनस्पॅनिशादी भाषांपेक्षा कितीतरी भिन्न आहेत. इथे (आणि इतर अनेक ठिकाणीदेखील) नैसर्गिक (किंवा मानवी) भाषा आणि संगणकाची भाषा ह्यांत गल्लत होते आहे. ह्या दोन प्रकारांतल्या भाषांची तुलना होऊच शकत नाही.
चैत रे चैत,
प्रतीसादातील आपली उत्तरं आवडली. त्या उत्तरांबरोबरच मला हे ही सांगावसं वाटतं की, संगणकाशी संवाद साधणाऱ्या भाषांचा, खरतरं 'आज्ञा सूचक तर्क पद्धतींना', 'भाषा' म्हणून संबोधीत होता कामा नये होते. तसं झालं तर कूठल्याही भाषेतून, मराठी भाषेतून ही संगणकाच्या ह्या 'आज्ञा सूचक तर्क पद्धतींचा' वीकास करता येवू शकतो, हा वीचार सर्वसामान्यांना पटवणं सोपं जाईल.