येथे ही आपल्याला पुस्तकापर्यंत जाता येते, नवी पुस्तके हाताळता येतात. स्वतः पुस्तकांना हात लावणे, चाळून पाहणे , त्यांचा वास घेणे, वानगी दाखल काही वाचणे आणि मग खरेदी करणे हा खरोखरच आनंदाचा भाग आहे.
श्री. अभय थिटे यांचा भ्रमण ध्वनी- ९४२२३३१८६४ , शक्य तर फोन करून जावे , त्यांच्याशी गप्पा मारणे आणि त्यांच्या टिप्स घेणे हा ही एक आनंदाचाच भाग!
रसिक दुकानदार असल्याचा फरक जाणवतो, अन्यथा, अमुक पुस्तक विचारल्यावर पुस्तक दुकानदार- प्रकाशक कोण सायेब? असे विचारणार! त्यातील लेखक, विषय- वस्तू विषयी त्यांना काही देणे- घेणे नसते.