शेवटचा एक परिच्छेद गाळला तर कथा अधिक परिणामकारक होते आहे असे वाटते.

संपूर्ण गोष्ट एका शाळकरी मुलाच्या दृष्टिकोनातून सांगितलेली आहे आणि गोष्ट घडण्याचा काळ ही सुमारे तीस वर्षांपूर्वीचा - सुमारे एक दोन महिन्यांचा आहे. मात्र केवळ गोष्टीचा शेवट सांगण्यासाठी शेवटच्या परिच्छेदापुरता हा काळ वर्तमानात येतो. ते कदाचित (काहींना) खटकत असावे.

म्हणजे संपूर्ण नाटक पाहून झाल्यावर प्रेक्षकांनी संभ्रमित अवस्थेत घरी जाऊ नये म्हणून मुख्य पात्राने रंगभूषा आणि अवधान उतरवून पडद्यातून बाहेर येऊन घाईघाईने कथेचा अंत लोकांना सांगितल्यासारखे वाटते.

कदाचित कथेची सुरवात वर्तमानातून करून (म्हणजे परदेशातून काही पत्र/फोटो/संदेश येतो ... इ. ) त्यातून पूर्वकथनपद्धतीने कथा सांगत गेल्यास शेवटच्या क्षणी पूर्वकथनातून बाहेर येता आले असते. अर्थात एखाद्या चित्रपटात हे सुंदररीत्या जमले असते.  (कथा लिखितरूपात सांगताना मात्र कदाचित सगळी कथा वर्तमानकालीन व्यक्तीच्या भाषेतून सांगावी लागली असती की काय?   )

असो. कथा रंगतदार आहेच ह्यात वाद नाही. मात्र काहींना शेवट अनुरूप का वाटत नसावा ह्याबद्दल मनात आले ते लिहिले.