असेल, तुम्ही म्हणता तसे असेल. परंतु मनोगतावर लिखाणाला एकदा प्रतिक्रिया आली की सामान्य सदस्य-लेखकास आपले लिखाण गाळता काय, संपादितही करता येत नाही. तसे करायचे असल्यास प्रशासकांना व्य. नि. /विरोप पाठवावा लागतो. प्रशासकांना स्वतःची इतर शंभर व्यवधानं असल्यामुळे ते गाळणं/संपादन साधारणपणे अर्ध्या-एक दिवसानंतर केलं जाते. "लाजरी????" बद्दल मात्र सर्व घटना अतिजलद गतीने घडत गेल्या. आता हे गलिबसातारकरबुवा मनोगतावर नवागत (निदान या नावाने तरी!). असे असूनही त्यांची प्रशासकांकडे हॉटलाईन ? छॅ! आपल्याला कधी जमणार बुवा अशी नेटवर्किंग?
. असो. तुमचा पहिला प्रतिसाद वाचून आम्हाला आपलं उगाच वाटलं की प्रसादरावांनी ही नवीन आयडी घेतली की काय. ही शक्यता ग्राह्य धरल्यास अनेक प्रश्नांची आपोआप उकल होते. मनोगतचे मॉडरेटर्स असल्याचा संशय ज्यांच्यावर आहे त्यापैकी नाहीतरी प्रसाद एक आहेतच.