हल्ली ह्या शिखराची उंचीच कळत नाही. स्पर्धात्मक आयुष्य आणि प्रतिष्ठा याकरताच जन्म आहे असेच मानले जाते. स्वतः च्या मनाशी प्रामाणिक राहून समाधानाच्या शिखराची उंची मोजणारे कमीच मिळतील. ऐश आणि आरामासाठी चाललेली ही धडपड, माणसाची 'हाव' नेमके तेच उपभोगण्याची संधी देत नाही. ग्रामिण वृद्धाप्रमाणे बायकोच्या अंगावर वीस तोळे मढवून कृतकृत्य झाल्याचे समाधान बाळगणारे थोडकेच.