मिलिंद फणसे, बालिका, स्मिता चावरे, हेमंत पाटील, मुमुक्षू, सतिश वाघमारे, निर्मिती व साधना सगळ्यांनीच गाणे बरोबर ओळखलेले आहे. हार्दिक अभिनंदन!

बालिका व हेमंत वगळता इतरांनी पूर्वार्ध 'ती'नेच गायला असल्याचे उत्तरही बरोबर दिलेले आहे. पुन्हा एकवार अभिनंदन!

या गाण्यातील सर्वच पूर्वार्ध अत्यंत सकारात्मक आहेत. आणि ते 'ती'नेच प्रस्तावित केलेले आहेत.

म्हणून आपण असे म्हणू शकतो काय की स्त्री दुनियेकडे सकारात्मकदृष्ट्या पाहते?