काल घाईघाईने प्रतिसाद देताना फक्त आक्षेप आणि तक्रारीच लिहिल्या गेल्या त्याबद्दल क्षमस्व. बरेचसे क्लू सोडवताना प्रचंड मजा आली. विशेषतं कडा लावूनही किंमत सारखी राहणे किंवा मैत्री तोडणारा नि:श्वास.
एकूणच एकाक्षरी कोड्याची संकल्पना आणि त्याचे झकास सादरीकरण खूपच अभिनव आणि मनोरंजक आहे. काही काही अक्षरांनी जरा जास्त त्रास दिल्यामुळे त्रासलेल्या मनस्थितीत कालचा प्रतिसाद लिहिला म्हणून आज दिवसभर चुटपूट लागून राहिली. म्हणून आज संधी मिळताच हा प्रतिसाद लिहीत आहे.
अशीच मनोरंजक कोडी आणखीही सोडवायला मिळावीत अशी इच्छा आहे
--अदिती