मला वाटते की असंभव हा 'इम्पॉसिबल'साठी जास्त योग्य आहे. 'इम्प्रॉबबल'साठी असंभाव्य बरा वाटतो.
'इम्पॉसिबल' म्हणजे unable to happen आणि 'इम्प्रॉबबल' म्हणजे unlikely to happen असतं असं वाटतं. दोघांच्या छटा थोड्याशा वेगळ्या आहेत. 'इम्पॉसिबल' हा 'इम्प्रॉबबल' पेक्षा जास्त तीव्र वाटतो. तसाच छटेचा फरक असंभव आणि असंभाव्य मध्ये आहे असं वाटतं.
असंभव म्हणजे जे होणारच नाही ते आणि असंभाव्य हे जे होण्याची शक्यता नाही ते...