भास्कर-बुवा,
अहो इथे थोडा गैरसमज झालाय. तुम्ही तुमचा प्रतिसाद काढायला नको होता.  आपण सगळे समजुतदार आणि सुसंस्कृत मनोगती आहोत. तुमच्या प्रतिसादामुळे माझ्या भावना बिलकुल दुखवल्या नाहीत...उलट तुमच्या समजल्या. मला तुमचा प्रतिसादाच्या योग्यायोग्यतेबद्दल काहीच म्हणायचे नव्हते. तुमचा प्रतिसाद नावडण्यापेक्षा प्रभाकरांचा अंशतः पटला होता/आहे.

"त्या उलट जीवनाशी झगडत, आपटत व ठेचा खात जी मुले शिक्षण घेत पुढे जातात, समाजात कुठेतरी स्वतःची जागा बनवतात त्यांची दृष्टी फार वेगळी असते. ते स्वतः समाजाच्या मागास भागातून आलेले असल्याने त्यांना त्यांच्यासारख्याच होतकरू परंतू परिस्थितीपुढे हात टेकलेल्या लोकांसाठी करायचे असते."

यात मला तरी काही भावना दुखावणारं वगैरे दिसलं नाही. उलट मी याचाशी पुर्णपणे सहमत आहे.

"ज्या दोन-चार मागास वर्गीयांची वागणूक मी पाहीली आहे त्यांना प्रातिनिधिक मानलं (मी मानत नाही) तर चित्र वेगळं दिसतं. "

हे मला रास्त आणि पटणारं वाटलं होतं/आहे.

फक्त माझ्या प्रतिसाद देतानाच्या आळसामुळे घोटाळा झाला खरा. याबद्दल मनापासुन क्षमस्व.

चु.भु.द्या.घ्या.
पुन्हा एकदा क्षमस्व.
-भोमे-काका