"मी फुलं घेऊन करू काय? 'माझं' असं कोणीच नाही आहे फुलं द्यायला".
"आपलंस करायलाच तर फुलं द्यायची असतात, " मी पुन्हा निरुत्तर.
मग तिनं मला सायलीची फुलं दिली, म्हणाली "ही फुलं वरच्या खिशात ठेवा़; मग दिवसभर फक्त सायलीचाच वास. " मग मीही असा कायमचा सायलीमय झालो.

पण मग एक दिवस आला आणि सगळंच बदलून गेलं      

खिशातल्या सुकलेल्या फुलांचा वास येणंदेखील थांबलं होतं. खूप ठिकाणी चौकशी करूनसुद्धा काहीच समजलं नाही.
मी एका फूलवेडीसाठी एवढं अस्वस्थ का व्हावं, हे लोकांना कळत नव्हतं.
बऱ्याच दिवसांनंतर सॅलीबद्दल समजलं आणि मनावरचं ओझं दूर झालं.

गेली होती फुलांची राजकन्या, फुलांच्या देशा.......

छान... छान...

.... ही कथुली (!!! ) फुलांविषयी असली तरी `चटका ` लावून गेली...!
भावनांच्या दृष्टीने आणखी गडद आणि आणखी आटोपशीर करता आली असती... पण जे आहे, तेही छान आहे... शुभेच्छा!