योग्य शब्द कसा आहे? ब्रम्ह की ब्रह्म?
ताम्हन किंवा म्हण
आणि
ब्राह्मण
हे शब्द उच्चारून पाहा. ह्यांतल्या म्ह आणि ह्म च्या उच्चारात तुम्हाला काहीच फरक वाटला नाही, तर म्ह किंवा ह्म कसेही लिहिले तरी तुम्हाला काही चुकीचे वाटायचे कारण नाही.
संस्कृतात जोडाक्षरे उच्चारताना आधीच्या अक्षरावर किंचित अडखळल्यासारखा उच्चार होतो.
फरक समजून घ्यायचा असेल तर
पुण्यात (पुणे येथे) आणि पुण्यात (पुण्य - त्यामध्ये) हे उच्चार पाहा.
मराठीत पु - ण्यात असे तोडले जाते. संस्कृताप्रमाणे पुण् - यात असे म्हणावे लागेल.
आता म्ह किंवा ह्म बद्दल
ब्राह् - मण असा उच्चार स्पष्टपणे दाखवायचा असेल तर ब्राह्मण असे लिहायला हवे.
ब्रा - म्हण ( ब्रा - असे म्हण ह्याअर्थी ) म्हणायचे असेल तर ब्राम्हण म्हणावे लागेल.
मात्र मराठीच्या नव्या लेखननियमांमध्ये दोन्ही ह्म आणि म्ह स्वीकृत आहेत असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.