सदर लेखही सुंदर आहे.

हो, माझ्या लेखाचा दुवा शोधण्याच्या नादात प्रतिसाद देण्यास राहून गेले होते. आपण लक्षांत आणून दिल्याबद्दल आभार प्रदीपराव.

भारतातली वृद्धाश्रमांची नगण्य संख्या ही अभिमानास्पद/कौतुकास्पद गोष्ट मानली जावी ह्या मताचा मी आहे. एका चौकटीत जीवन जगलेल्या वयस्कर व्यक्तींना आपल्याकडे आदराची वर्तणूक मिळते हे सुसंस्कृत पणाचे लक्षण समजावे.
सुरुचींच्या ह्या लेखाच्या निमित्ताने लिहावेसे वाटते की, मुंबईत जेथे मी राहतो तेथल्या कमीत कमी ६०% कुटुंबांत (संमिश्र वस्ती आहे) एकत्र कुटुंबं पद्धती आहे. २० ते २५ % कुटुंबांतल्या वयस्कर व्यक्ती आपल्या दुसऱ्या (किंवा पहिल्या) अपत्याकडे राहतात. तर उर्वरित कुटुंबांतल्या वयस्कर व्यक्ती आपल्या मूळ गांवी किंवा मुंबईत विभक्त पद्धतीने राहतात तरी मुंबईतल्या मुला/मुलीकडे नियमित येणे जाणे असते. हजारांतले एखादे कुटुंबं असे उध्वस्त असावे की, ज्यातल्या वयस्कर व्यक्तींना नाईलाजाने वृद्धाश्रमात राहवे लागत असेल.  

बागवान सारखा चित्रपट लोकप्रिय ठरण्यामागे हेच कारण असावे - जे आपल्याला बघायला मिळत नाही त्याचे अप्रूप जास्त वाटणे साहजिक आहे.  पाश्चिमात्य देशांत (रोज मरे त्याला कोण रडे ह्या उक्तीनुसार) एकत्र कुटुंबं पद्धती हेच अप्रूप समजावे.