शेवटची ना आज घोषणा करतो आहे टंकत असता हात जरा थरथरतो आहे
विडंबकाला वाहवाहवा करती सारे कवी त्यामुळे कसा अंतरी जळतो आहे
उदासलो मी शुक्रवारच्या सायंकाळी अर्धा प्याला रिताच मजला छळतो आहे छान!
हाय मला पण नकाच गांभीर्याने घेऊ कुणास ठाउक प्याला कितवा भरतो आहे छान!
परंपरेप्रमाणे मूळ रचनेतली शुद्धलेखनातली चूक सांभाळून केलेले विडंबन आवडले. "अभिजात लेखनाचा निश्चय होता मी केला" इथे जरा वाचताना अडखळल्यासारखे वाटते. मी काढून टाकल्यास अडखळणे दूर किंवा कमी होऊ शकेल. "अभिजात | लेखनाचा | निश्चय होता केला" असे तुकडे पाडले तर.