अप्सरा स्वर्गी किती आहेत बाकी?
आत्मघाती खूपसे रांगेत बाकी!
चार विकले, दोन फुटले, गणित चाले
खासदारांचा कळप पागेत बाकी
खंत का विझल्या जरी साऱ्या मशाली
काळजी कसली? चिता आहेत बाकी...
हात आखडता कशाला पाप करता
खूप पाणी आजही गंगेत बाकी
वाहव्वा! फार फार आवडले शेर. गझलही एकंदर छानच झालीये. सामाजिक जाणीवांचे भान जास्त, आणि वैयक्तिक सुखदुःखे, अनुभव कमी अशा धाटणीचे लेखन आजकाल वाढू लागले आहे, हे चांगलेच आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या शेरांच्या वरच्या ओळी अधिक सफाईदार झाल्या असत्या/करता आल्या असता, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.