ही कविता

चिव चिव चिमणी
गाते गाणी
बांधले घरटे
झाले उलटे
पडले पिलू
पाहते लिलू
लिलूने बोट लावले
पिलूने बोट चावले
लिलू लागली रडायला
आई समजूत घालायला
लाडू दिला खायला
लिलू लागली हसायला

अशी म्हणायचो/म्हणतो. बालगीते म्हणताना शुद्ध शब्दात म्हणावी म्हणजे आपोआपच मुलांनाही तीच सवय लागायला सोयीचे जाते. ते बोबडे बोलतात म्हणून आपणही तसेच बोलल्यास आपण चुकतो आहोत ह्याची त्यांना जाणीव होत नाही, उलट कौतुक होतेयसे वाटून तीच सवय त्यांच्या अंगवळणी पडण्याचा धोका जास्त असतो.

बालदोस्तांसोबत खेळलेल्या बालगीतांच्या भेड्यांची आणि त्यातील इतर अनेक छानशा बालगीतांची आठवण आली ही कविता वाचून. धन्यवाद.