संस्कृतात क्लृप् असा प्रथमगणी आत्मनेपदी धातू आहे ज्याचा अर्थ 'समर्थ असणे' असा आहे. कल्पना हा शब्द ह्या धातूपासून बनलेला आहे. क्लृप्ती हा शब्द देखील क्लृप् ह्याच धातूपासून बनलेला आहे.
'ऋ'पेक्षाही 'लृ'चा उच्चार थोडा अवघड आहे. ज्यांना 'लृ' उच्चारणे जमत नाही ते अनेकदा 'लु' असा उच्चार करतात आणि तोच त्यांना योग्य वाटतो.