बोलीभाषेप्रमाणे उच्चारात असलेले शब्द पुढे योग्य म्हणून वापरले जातात. आज अथर्वशीर्ष म्हणताना अचानक या शब्दाबद्दल ही शंका आली. योग्य उत्तर सापडले नाही. म्हणून येथे विचारावे म्हटले. कुणास माहीत असेल तर कृपया सांगावे. योग्य शब्द कसा आहे? ब्रम्ह की ब्रह्म? मला असे वाटते की ब्रह्म असावे. पण तज्ञांनी सांगितले तर बरे पडेल.