* केदार पाटणकरांच्या यादीत मी आणखी एका महत्त्वाच्या ग्रंथराजाची [ होय, या ग्रंथाचा आकार (आणि अर्थात दर्जाही ) पाहिलात, तर तो ग्रंथराजच आहे, हे पटावे.] भऱ घालतो... त्याचे नाव आहे... मराठी व्युत्पत्ती कोश. लेखक आहेत प्रख्यात भाषापंडित कृ. पां. कुलकर्णी. मराठी शब्दांसंदर्भातील ग्रंथांच्या यादीत मराठी व्युत्पत्ती कोश हा ग्रंथराज पहिल्या क्रमांकावरच हवा. :) कृ. पां. हे आचार्य अत्रे यांचे जिव्हाळ्याचे मित्र होते.
* कृ. पां. यांचेच आणखी एक पुस्तक आहे - शब्द या शीर्षकाचे. तेही भाषेच्या अभ्यासकांनी जरूर जरूर वाचावे.
* य. रा. दाते आणि चिं. गं. कर्वे यांचा महाराष्ट्र शब्दकोश (आठ खंड) आणि त्यांचाच महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (दोन खंड) हेही ग्रंथ या यादीत पाहिजेतच पाहिजेत.