होराभूषण प्रकाशराव, आठवणीतला संवाद फार छान रंगलेला, लिहिलेला आहे. एकंदर चैत रे चैत आणि चक्रधर१ ह्यांच्याशी सहमत आहे. शाहू मोडक हे ख्रिश्चन होते असे कळते. हिंदूशिवाय मुसलमान, ख्रिश्चन इत्यादी धर्मांचे अनुयायी ज्योतिषाकडे वळण्याचे कारण काय असावे?(होरा बांधणे आम्ही ग्रीकांकडून शिकलो ही गोष्ट वेगळी) खालच्या समजल्या एका विशिष्ट जातीत जन्मलेला माझा एक मित्र उत्तम ज्योतिषी आहे असे विश्वास ठेवणारे म्हणतात. तो मुहूर्त वगैरे गोष्टी फार कट्टरपणे पाळतो. ज्योतिषावर विश्वास ठेवणारे इतर धर्मीय आणि माझ्या मित्रासारखे इतर जातीय ब्राह्मणांएवढेच किंवा किंबहुना जास्तच कट्टर का असतात, ह्याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे.