काय आहे माहीतीका अभि,प्रश्न भाजपचा नाहीये. कारण वैचारीकदृष्ट्या भाजपचा बसपला अथवा समाजआदीला विरोध नाही. हे लोक भाजपला कम्युनल म्हणतात, भाजप सतःला कम्युनल म्हणत नाही. समजा मी एक संगित दिग्दर्शक आहे. आणि तुम्ही एक चित्रपट दिग्दर्शक आहात. तुमच मत आहे की मी एकदम फाल्तू संगित देतो, मला संगितातल काहीही कळत नाही. आणि नंतर एक दिवस तुम्हीच माझ्याकडे तुमच्या पिक्चरला संगित दे हा प्रस्ताव घेउन येता. आता तुम्ही म्हणता की मला संगितातल कळत नाही पण मी सतः तर तस म्हणत नाही ना! म्हणजे भाजपला कम्युनल म्हणून सत्तेपासून दुर ठेवायला हवे असे जर कोणी म्हणत असेल तर त्याने भाजपशी युती करू नये. भाजपला तो प्रश्न येत नाही कारण भाजप सतःला कम्युनल मानतच नाही. भाजपने जर कम्युनिस्टांना पाठींबा दिला तर मात्र त्यांना संधिसाधू म्हणता येईल.