ह्या दोन्ही अक्षरांच्या लिखाणात फरक आहे. पहिला ल्+ऋ=लृ. यात ऋकाराचे चिन्ह 'ल' ला खालच्या बाजूला लागते आणि अक्षराची उंची वाढते. त्यामुळे उच्चार ल्ऋ.
ऌ हा स्वर आहे (उच्चार लि आणि लु यांच्यामधला). यात ऋकाराचे चिन्ह नाही.'ल' सारख्या दिसणाऱ्या अक्षराला जोडून खालच्या बाजूला जो कंस आला आहे, तो अक्षराचा भाग आहे. त्यामुळे अक्षराची उंची वाढलेली नाही. कॢप्तीमध्ये हा ऌ आहे, ऋकारवाला लृ नाही.
मराठीत ऌ असलेला फक्त कॢप्ती हा एकच शब्द आहे. संस्कृतमध्ये अनेक. उदाहरणार्थ दुसरा भविष्यकाळ आणि संकेतार्थाला अनुक्रमे ऌट्, ऌङ् म्हणतात.