माफ करा ....

माझ्या मते चर्चेचा विषय हा "जसे इंग्रजी हे बालवाडी, पहिली..... तसेच सर्व विद्या शाखेत वापरले जाते तसेच संस्कृत भाषेचा वापर व्हावा"........संस्कृत  अध्ययन......

त्यामुळेच असे वाटते थोडेसे विषयांतर झाले आहे. (गैर नाही परंतु .... )

असो,

प्रथम सर्वाचे आभार चर्चेच्या प्रतिसादा बद्दल.

हा चर्चेचा विषय आहे प्रश्नोत्तरांचा नाही. शंका रास्त आहेत कारण आपण ह्या गोष्टींचा कधी विचारच करत नाही. आपण वाट पाहत आसतो कोणीतरी त्या मोठ्याने सांगेल,

ठिक.. आता आपण थोडे शंकांन बद्दल बोलू ( ... टाईप करू   )

सर्वात प्रचीन भाषा - इतिहासाकांराच्या अभ्यासावरून संस्कृत ही ६००० बी. सी. पासून आहे... 

 ( अधिक संधर्भासाठी १) विद्दपीठ आयोगांनी ठरविलेली पाट्य पुस्तके

२)http://www.thevedicfoundation.org/valuable_resources/Sanskrit-The_Mother_of_All_Languages_partI.htm

३)http://www.loyalindia.com/index.php/Welcome-to-Loyal-India/NASA-article-on-Sanskrit.html

सर्व भाषेची जगत जननी - ह्या साठी पुरावे नाही आहेत ( असतील तर मला माहीत नाहीत) परंतु काही विद्दपीठ पाठ्य क्रमात ह्याचा उल्लेख आढळतो.

प्राचीन युगात संस्कृत हि बोली भाषा म्हणून वापरत असत- ११०० ए. डी. पर्यंत हिंदुस्थानाची अधिकृत भाषा होती.  ( मोघल आक्रमाणा पूर्वी.. )

 ( अधिक संधर्भासाठी १) विद्दपीठ आयोगांनी ठरविलेली पाट्य पुस्तके

२)http://www.loyalindia.com/index.php/Welcome-to-Loyal-India/NASA-article-on-Sanskrit.html

नुकत्याच जगप्रसिद्ध तज्ज्ञांच्या मते  संगणकास अतिशय उपयुक्त व अत्यंत जवळची अशी भाषा म्हणजेच  "संस्कृत "  -

नासाच्या ( मला वाटते ह्या बद्दल अधिक माहीतीची गरज नाही) अधिकृत  माहीती प्रमाणे संगणकास अतिशय उपयुक्त अशी भाषा आहे.

( अधिक संधर्भासाठी १) दुवा क्र. १

२) http://www.libervis.com/topic/sanskrit_as_an_object_oriented_language

क्रूड तेलाचा भाव आता बॅरलला १५० डॉ. च्या आसपास पोहोचला आहे- हा व्यवहार कुशलतेचा भाग आहे भाषेचा नव्हे

मराठी भाषा ही जशी अनेक नियतकालिके, दैनिक, मासिक आणि पाक्षिके यांनी सजलेली आहे तशी मासिके अथवा पाक्षिके संस्कृत भाषेत आहेत काय? - मासिके आहेत, अक्षरम-  दूरभाष - २६७२२५७६ (बेंगलोर)

त्यातही ही बोली संस्कृत म्हणजे नक्की कोणती? वैदिक संस्कृत की अभिजात (Classical) संस्कृत? कारण दोन्हीमध्ये फरक आहे. वैदिक काळापासून संस्कृत बरीच बदलली. बऱ्याच गोष्टी वापरातून नाहीशा झाल्या. (उदा. अनेक संस्कृत सूक्तांमध्ये येणाऱ्या स्वरांच्या खुणा) पण कालांतराने संस्कृतचे व्याकरण अधिकाधिक दृढ होत गेले आणि कालांतराने ते जडशीळ झाले. एखादी भाषा बोलीभाषा म्हणून जिवंत राहण्यासाठी तिच्यात कालानुरूप बदल होणे अत्यावश्यक आहे. तसे बदल संस्कृतात फारसे झाले नाहीत आणि एक बोलीभाषा म्हणून ती लोप पावली.
-आपल्या मताशी सहमत आहे

पण दुर्दैवाने हे मात्र शक्य आहे की पाश्चात्त्य (आता केवळ पाश्चात्त्यच नव्हे तर जपानादी पौर्वात्यसुद्धा) देशांनी संस्कृतचे कोडकौतुक करेपर्यंत आपल्याला संस्कृतमध्ये गोडी उत्पन्न होणार नाही. एखाद्या आपल्याच गोष्टीचं अंगडं-टोपडं काढून तिला जीन्स-टी-शर्ट चढवल्याशिवाय ती गोष्ट आपल्याला हवीशी वाटत नाही. कारण तोवर तिला 'स्टेटस' मिळत नसतो.

-आपल्या मताशी सहमत आहे

परंतु आपल्या ""संस्कृत आणि संगणक ह्या दोन्ही गोष्टी न जाणणाऱ्या लोकांनी असा गैरसमज पसरवून ठेवला आहे. " मताशी असहमत आहे

( अधिक संधर्भासाठी १) दुवा क्र. २

२)http://www.speaksanskrit.org/forum/viewtopic.php?t=115

चर्चेचा वीशय मला जरा देखील आवडला नाही.  - सहमत

परंतु ह्यातील मूद्दे फक्त एकीव माहीतीवर आधारलेले व म्हणून नीव्वळ गैरसमजातून पसरलेले आहेत. - असहमत कारण ह्या मागे आभ्यास आहे ( माझा नाही...   ) वरीला संदर्भ दुव्याचा वापर करावा

संस्कृतला पूनर्जीवन देण्याचे वीचार कशासाठी? 

-पाश्चात्त्य देशांनी संस्कृतचे कोडकौतुक करेपर्यंत आपल्याला संस्कृतमध्ये गोडी उत्पन्न होणार नाही ...फक्त हेच टाळण्यासाठी

"संस्कृतचे जतन करण्यासाठी तिचं ओझं पहिलीपासून वगैरे मुलांच्या अंगावर लादणं यासारखं क्रौर्य नसेल. " 

- नावडीने केलेल्या गोष्टीचें ओझं  होते, ओझं  लादणं हे क्रौर्यच.

- संस्कृत हे सर्वच शिकले किंवा शिकविले पाहीजे असे थोडीच आहे.  कोणतीही भाषा शिकताना किंवा शिकविताना त्याचे महत्त्व व उपयोग लक्षात घेतले पाहीजेत.

जसे संस्कृतमुळे वाचा शुद्धी होते ( उच्चार ) तसेच उपयुक्त संस्कृत मंत्रांमुळे मन शुद्धी होते.

म्हणूनच मला वाटते कामापुरते का असेना पण संस्कृत  अध्ययन हे केलेच पाहीजे