मला मार्ग सुचलेला आहे. सुरुवात स्वतः पासून करायला हवी, असं किमान १% लोकांनी तरी करावं,म्हणजे कुठे पुढे जाऊ शकतो. आता प्रत्येक जण ठरवूनच घेतो की पैसे द्यायचेच आहेत. वाहन परवाना काढायला जा, तिथे पहिला प्रश्न कुठल्या 'एजंट' तर्फे अर्ज करता आहात? आणि जर स्वतः अर्ज केला तर तुम्हाला परवाना मिळणार नाही.जो पर्यंत १ टक्के तरी लोकं ठरवत नाही की नाहीच देणार मी पैसे, तोपर्यंत 'अंधारच' आहे डोळ्यांसमोर.