-

-

-

बापरे बाप! राजकीय घटनांवर आपले चांगलेच नीरीक्शण दीसतयं. एवढी माहीती आपण लक्शात देखील ठेवलीय. खरचं आपली स्मरणशक्ती चांगलीच आहे बूवा!

मला तरी राजकारण  व त्याचे पडसाद हे बदलत्या जगाचे रूप वाटते. इंग्रजांनी देश सोडताना भारतीयांची मती दूभंगली. तेव्हापासून जसा प्रवाह जाईल तसे जायचे पण नैतीक/ धार्मीक मूल्यांचा अतीरेकीपणा टाळावा ही एक मानसीकता तयार झाली व त्याच बरोबर प्रत्येक बाबतीत नैतीक मूल्ये जपणारी एक मानसीकता या देशात झाली. ह्या दोन मानसीकतेचीच आता अनेक शकले झाली आहेत. त्यामूळेच प्रांतवादी मानसीकताही तयार होत आहे.

देश अखंडपणे चालवायचा असेल तर ह्या सऱवांच्या उपर एक नवी मानसीकता तयार होणं ही गरजेचे आहे. पण ते शक्य कसे होणार? हे ते येत्या काळात समजून येईल. कारण जेवढ् या वीभीन्न मानसीकता अस्तीत्वात असतील तेवढे देशाच्या अस्तीत्वाला धोकादायकच आहे.

माझं व्यक्तीगत मत - श्री. राज ठाकरेंचे नेत्तृत्व हे काळाच्या मागणीनूसार चालणारी पण त्याच बरोबर वीवीध धर्माच्या लोकांना धरून चालणारी मानसीकताच (सध्यातरी) योग्य वाटत आहे. सूरवातीला प्रत्येक नवी गोष्ट वीचीत्रच वाटते. पण त्यानंतर तीचं महत्त्व लोकांना कळतं. गांधीजींची 'अहींसावादी' पाऊलं त्यांच्या काळात अनेकांना वीचीत्रच वाटली होती. पण बलाढ् य प्रशासन संस्थेशी तसंच लढणं गरजेचे होते. आताची लढाई देशावर स्वतःच्या संस्कृतीचा ठसा उमटवण्याचीच आहे. लढावू बाणा हेच प्रतीबींब उद्द्याच्या (प्रगत) भारताच्या नेत्ऱूत्वात दीसावयाचे असेल तर, 'सूसंघटीत बळी, तो कान पीळी' हाच उपाय सामान्य स्तरापासून उरतो.