१. शिवकालीन पाणी योजना म्हणजे नक्की काय? आणि ती कशी अंमलात आणतात?
मला वाटतं की अशी योजना प्रामुख्याने गडावर पाणी साठा करण्यासाठी उपयोगी होती. आणि पाणी वापर दिखील कमी होता.(नळ,वोशींग मशीन, फ़्लश खूप जास्त पाणी वाया घलवतात.)
२. 'भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये बोअरवेल, विहिरी खोल करणे, हातपंपांची दुरूस्ती अशी ही कामे करण्यात येणार आहेत. ' हे हास्यास्पदपणे गंभीर वाटत नाही का? अगोदरच जिथे भूजलपातळी खालावलेली आहे तिथे आणिक उपसा झाला तर परिणाम महाभयंकर नाही का व्हायचे?
बरोबर आहे, पण जिथे आजच पाण्याची वाण आहे तिथे तात्काळ उपाय वापरावा लागेलच.
३. दुष्काळी परिस्थिती कधी जाहिर केली जाते? आणि तशी ती जाहिर झाल्यास पीडीतांना काय 'राहत' देण्याचे प्रयत्न होतात?
पहिला प्रश्न कठीण आहे.............. खूप आरडा ओरडा झाल्यावर असेच उत्तर द्यावे लागेल.
दुसरा............. त्यांना कुठलाही कर भरावा लागत नाही(त्या वर्षाचा) आणि त्या वर्षाचा शेती खर्च सरकार उचलतं(बहुतेक)
४. नद्या जोडण्याच्या कामाचा मुद्दा मागे पडण्याचे कारण काय?
रस्ते आणि ट्रॅक्स जोडायलादेखील खूप प्लॅनिंग लागते. मग नद्या जोडणं तर..... शिवाय पैसे, स्थानिक लोकांचा मुद्दा, असेही अनेक मुद्दे आहेत.
पण हे झालं आपल्या "एबिलीटी" बद्दल, मला चिंता दुसऱ्याच गोष्टीची आहे.
आपल्या पर्यावर्णावर त्याचे काय परिणाम होतील हे लक्षात येणं जवळ जवळ अशक्य आहे. केओस थिअरी सांगते की छोटे छोटे बदल, खूप मोठ्या बदलांना कारणीभूत ठरू शकतात. असे बदल ज्यांचा अंदाज वर्तवणं केवळ अशक्य आहे.
तेंव्हा एव्हडा मोठा बदल.........................
५. रोगट वातावरण येऊ घातलेय/आलेय असे म्हटले तर अतिशयोक्ती होईल का?
एकूणच वातावरण रोगट झालं आहे. पण हो, शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे रोग पसरण्याची शक्यता वाढली आहे.
६. आता उभ्या ठाकत असलेल्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल उपायात्मक दृष्टीने आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो?
पाणी कपातीशिवाय लोक पाणी कमी वापरतील असं मला वाटत नाही.
परवा महाराष्ट्र टाईम्स मध्ये बदलापुरमध्ये एका बिल्डींगमध्ये आमलात आणलेल्या योजनेबद्दल माहिती आली होती.
वरच्या मजल्यावरच्यांचे वोशींग मशीनचे पाणी खालच्या मजल्यावरच्यांच्या टोयलेटच्या फ्लश मधे......
असे अनेक उपाय करता येतील.......... पण मला नाही वाटत की शहरी भागामध्ये येणाऱ्या पाण्यात कपात करून ते पाणी वरदाने सांगितलेल्या भागांमध्ये वळते करण्यापर्यंत आपली मजल जाईल. सध्या तरी त्या त्या भागात (ग्रामीण म्हणतोय मी, तसं मुंबईत सक्तीचं पाणी तुंबणं होतच) रेन वोट्र हार्वेस्टींग्ला पर्याय नाही...........
७)खेडोपाडी राहणारे माझे नातलग/जीवलग ही काय माणसं नाहीत का की त्यांच्या मूलभूत गरजांना शहरी माणसांच्या गरजांपेक्षा दुय्यम स्थान दिले जावे?
कधी कधी मला हे बरोबर वाटत तर कधी कधी चुकीचं. जर खरच पूर्ण देशात समान सोयी सुविधा पुरवल्या गेल्या तर शहरांचा इतका विकास झाला नसता.
अनेक आधुनिक क्षेत्रांमध्ये रिसोर्सेस गुंतवणं शक्य झाले नसते. आपण सध्या प्रगत देश ज्याला म्हणतो आहोत, असं मिरवता आलं नसतं
पण मग दुसरी बाजू पण पटते, ही प्रगती कश्याच्या जोरावर? संतुलीत प्रगती नाही का होऊ शकत?
आणि मुख्य म्हणजे पाण्यासारख्या मुलभूत सेवेमध्ये एव्हडा भेदभाव नको.
सगळ्यात शेवटी बाकीच्यांचं जाऊद्या आपण मनोगती "आपल्या घरापूरतं काय करू शकतो", ह्या कल्पना तरी अमलात आणू शकतो ना?
मिलिंद ची सूचनेपासूनच सुरुवात करायला काय हरकत आहे? अजून कल्पनांचे स्वागत.