सोनलताई तुम्हाला आजच्या काळातला इच्छापूर्ती करणारा गूगलबाबा माहित्ये का हो? त्यावर काही गूगललंना तर तुमच्या मनात जे आहे ते तो बहुतांश वेळा शोधून देतो पण याचा अर्थ ते खात्रीलायक असते असे नाही. मी तुम्ही दिलेल्या दुव्यातील फक्त नासाचा लेख म्हणून सांगितलेला दुवा वाचला. तो लेख नासाचा नाही. तो ज्या लेखकाने लिहिला त्याने स्वतःचे नावही दिलेले नाही. संदर्भादाखल त्या लेखात १९८५ साली कोणा रिक ब्रिग्ज या संशोधकाचे नाव दिले आहे. मला वाटतं अशाप्रकारची ५६ संशोधने दिवसागणिक प्रसिद्ध होतात. (हे विधान अतिशयोक्तीपूर्ण असू शकते परंतु खोटे नाही) एका विशिष्ट वनस्पतीपासून इंधन तयार करण्याचे संशोधनही आपल्या देशात झाले होते.
आपला प्रतिसाद वाचून मला असं वाटलं की संस्कृताआधी मराठी शिकण्याची गरज आहे, निदान मला तरी. मला मराठीतलेच अनेक शब्द माहित नाहीत. लिहिताना शुद्धलेखन चुकते वगैरे. आपल्याला प्रतिसाद लिहिता लिहिता तसे वाटले का हे कळत नाही. असो, काळाचीच गरज बघायला गेलं तर अनेकांना ती कधीचीच समजली आहे. म्हणून त्यांची मुले इंग्रजी माध्यमात जातात आणि कामापुरते मराठी आणि हिंदी शिकतात.