हे विचारण्याचा एकच हेतू आहे की मी ह्या साखळीच्या वरच्या टोकाला नाही गेलो आणि त्यांना कधी विचारलं नाही
साखळीच्या खालील टोकाला कधी जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जाणवते ती आपली कारणं शोधायची आणि कारणं द्यायची कल्पकता. सुरेशची आणि सिनियर डॉक्टरची कारणं माहित झाली. पण ती गरज आहे का हे ज्याने त्याने ठरवायचं आहे; त्यावरील उपाय हे ज्याचे त्याचे आहेत. ते जर वैकल्पिक असतील आणि आपण या समाजाचे घटक नाही आहोत असे मानले तर मग वृथा चिंता तरी का करावी?
मला अजून तरी भ्रष्टाचार करावा लागला नाही. कारण ज्या गोष्टींसाठी तो करावा असे वाटते त्या गोष्टींना किती प्राधान्य द्यायचे हे ठरविण्याचा अधिकार तर मला आहे? पण तोच विबेक मला नसेल तर...