गेली २ वर्षे महाराष्ट्रात उन्हाळ्यात टंचाई व पावसाळ्यात पूर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर उपाय म्हणजे रिचार्ज पिट. यात आपल्या प्लॉटमध्ये एक बोअर प्रमाणे खड्डा खणावा. यामध्ये आपल्या जागेतील पावसाचे पाणी सोडावे. यामुळे पूर व दुष्काळही कमी होईल. पूरामध्ये बरेचसे पाणी रस्ता सोडून इतर ठिकाणावरून आले असते. हे जर मुरवले तर पूर कमी होतील व भूजल वाढेल.