'सेक्युलर' ह्या शब्दाला भारतात बहुधा वेगळीच अर्थच्छटा आली आहे.
 
 - वेगळीच अर्थछटा नाही, वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे. भारताच्या राजकारणात व वृत्तपत्रांमध्ये 'सेक्युलर'चा अर्थ अल्पसंख्यांकवादी.
सेक्युलॅरिझम्ला नेमका मराठी प्रतिशब्द नसावा परंतु त्याचा अर्थ
१)"धी कंप्लीट सेपरेशन ऑफ रिलिजन ऍंड स्टेट" : - धर्म व शासन यांची एकमेकांपासून संपूर्ण अलिप्तता*

२)"अ सेस्टीम ऑफ सोशल ऑर्गनाय्झेशन ऍंड एजुकेशन विच बिलिव्स् दॅट रिलिजन हॅस नो पार्ट टू प्ले इन धी प्रॉब्लेम्स् ऍंड एवेंटस् ऑफ एवरीडे लाईफ" :-  सामाजिक संरचनेची व शिक्षणाची अशी प्रणाली जी मानते की रोजच्या आयुष्याच्या अडच्णींमध्ये व घटनांमध्ये धर्मास काहीही स्थान/भूमिका नाही.

* - यावरून सेक्युलॅरिझम्'साठी धर्मालिप्तता असा शब्द बनवावा काय?