हिंदूंना विरोध म्हणजे नक्की काय? सरकारी/खाजगी नोकऱ्या, शाळाप्रवेश, शिक्षण, घरखरेदी, व्यापार सर्व ठिकाणी करून हिंदूच आघाडीवर आहेत. हे सगळे सरकारी धोरणामुळेच नाही का? भाजप किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही सरकारने हिंदूंनी अमुकतमुक करू नये अशी बंदी घातलेली होती का? हिंदू आणि मुसलमान दोघांनाही आपापल्या धर्माप्रमाणे वागायला परवानगी नाही का?. गेली कित्येक वर्षे काँग्रेसचे सरकार भारत/महाराष्ट्रात आहे. किती मुख्यमंत्री/पंतप्रधान/मंत्री/अधिकारी हे मुसलमान होते? लोकसंख्येच्या प्रमाणात तरी मुसलमानांना प्रतिनिधित्व दिले गेले का? तसे व्हावे यासाठी प्रयत्न केलेत का?

शिवसेना, भाजपा, बजरंग दल, सनातनी वगैरे लोक कट्टर मुसलमानांप्रमाणे आणि क्रुसेडकालीन ख्रिश्चनांप्रमाणे कडवे वागण्याचा प्रयत्न करून हिंदू धर्माला आणि समाजाला हीण आणत आहेत. मध्यपूर्वेत किंवा अरबस्तानात जसे कायदे आहेत तसे इथे असावेत असा यांचा आग्रह असतो. हिंदू असण्याचा 'गर्व' बाळगा अशी घोषणा करणाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे अनेकदा हिंदू असण्याची लाज वाटते.  या लोकांना हिंदू धर्म समजला आहे की नाही याचीच शंका वाटते.