केशवराव अहो! काय हे?
'अंदाज तारखांचा चुकला जरा असावा', 'होता सुसाट वारा घुसला झग्यात माझ्या' वगैरे अप्रतिम विडंबने आठवून हसावे की तुमचा हा निर्णय वाचून रडावे, काही कळत नाही बॉ.
ह्मणवितों दास । मज एवढी च आस ॥१॥
परी ते अंगीं नाहीं वर्म । करीं आपुला तूं धर्म ॥ध्रू. ॥
बडबडितों तोंडें । रितें भावेंविण धेंडें ॥२॥
तुका ह्मणे बरा । दावूं जाणतों पसारा ॥३॥
या ओळी वाचून पुन्हा एकदा विचार करा बरे.