सुरुचिसुरुचि,
तुम्ही काढलेली खोडी व घेतलेले चिमटे अतिशय आवडले. माझ्या पद्यकोलांट्यांत तुम्ही दाखवेलेली सु-रुची पाहून आनंद झाला.

डोळे सदाच शोधी काव्यात "व्यर्थ" काही!

 - काय करू? हंस असतो तर काव्यातील मोत्याचा चारा वेचला असता, नीरक्षीरविवेक असता. पण देवानेच काकदृष्टी देऊन पाठवले, नाईलाज आहे. काव, काव.(हा आवाज आहे की वाचकांस आज्ञावजा सूचना या वादात मी मुळीच पडणार नाही.)

केल्या तुझ्याच खोड्या तर का चुकतं काही?

 - अजिबात नाही. अजून येऊ द्या.

कळावे, राग निवळावा, लोभ असावा.
खोडसाळ.