मुंबई , पुणे , ठाणे व इतरही शहरांत जी काही नवीन ग्रुहसंकुले रहण्यास तयार होत आहेत त्यांत ( काही तुरळक सन्माननीय अपवाद वगळता ) , इमारतीन्मधील मोकळ्या जागेवर सिमेंट चे कोबे अथवा ऍन्टीस्कीड टाईल्स बसवलेल्या दिसतात. ह्यामुळे बांधकामाचा खर्च तर वाढतोच पण पावसाचे जे पाणी उघड्या जमिनीत मुरले असते , ते पाणी गटारान्मधून वाहून जाते.
ह्याचे दोन महत्वाचे आणि इतर अनेक ( चर्चा विषया शी संबंधित नसलेले ) दुष्परिणाम पाहवयास मिळतात.
पहिला- स्थानिक भूजल पातळी वाढत नाही, बोअर-वेल्स जास्त वेळ चालतात , विजेचे बिल वाढते .
दुसरा - जे पावसाचे पाणी जमिनीत जिरण्याऐवजी गटारन्मधून वाहते ते नगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया सन्यंत्रा वरचा भार वाढवते. परिणामी विजेचा ( व इतर कन्स्यूमेबल्सचा ) अपव्यय. ह्या पावसाच्या पाण्याला शुद्धीकरणासाथी कुठलयाही जैविक व रासायनिक प्रक्रियेची गरज नसते. तरीही केवळ ते जिथे पडते तिथे ते जिरत नाही म्हणून हा दुहेरी अपव्यय.
सध्याच्या भयंकर ( आणि भविष्यातल्या कल्पनातीत ) वीज टंचाईत हा अपव्यय भरच घालतोय.
नगरपालिका ( वा बांधकाम परवानगी देणारी इतर अन्य सरकारी / निम-सरकारी खाती ) या बाबत काही करतील अशी अपेक्षा बाळगणेच चूक ठरेल.
आपण रहिवाश्यान्नीच काहीतरी करण्याची गरज आहे.
बिल्डर ने केलेले हे काम ( ज्याचे दाम आपण आधीच मोजले आहे ) ते तोडून जमीन उघडी करणे म्हणजे तुघलकी तोडगा ठरेल. त्या ऐवजी आपण हे पाणी जिथल्या तिथे जिरवण्यासाठी सोक-पिट , रीचार्ज वेल्स ईत्यादी सुविधा आपल्या संकुलात करून घेतल्या पाहिजेत. ही काही फार कठीण / खर्चिक टेकनॉलॉजीही नाही. सर्व शहरांत ही कामे करू जाणणारे / करून देणारे कन्सलटंटस / ठेकेदार उपलबध आहेत.
जुलै / ऑगस्ट मध्ये सर्व सोसायट्यांच्या वार्षिक सभा होत असतात. मग तुम्ही तुमच्या सोसायटीच्या सभेत हा मुद्दा मांडणार ना ?