'ऱ्हस्व-दीर्घाचे नियम'मधून
मराठी शब्द तीन अक्षरी असून
त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपान्त्य
ई-ऊ यांच्या जागी 'अ' आल्याचे दिसते.
उदाहरणार्थ: बेरीज - बेरजेला; लाकूड - लाकडाला, लाकडांना. |
मात्र पहिले अक्षर ऱ्हस्व असल्यास हा 'अ' आदेश विकल्पाने होतो.
उदाहरणार्थ: परीट - पर(रि)टास, पर(रि)टांना.