कळले नाही कसा कधी संवाद संपला
वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही
वा...
मान्य कधीही केले नाही आपण चुकलो
दोघांमधले अंतर मग हे घटले नाही
छान...
बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो
रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही
मस्त...
बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही
ठिपका होत जाताना बघत राहणे... चांगली कल्पना