आज अचानक अर्थ असा हा समोर आला
त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही
- वा वा, ही द्विपदी खूप आवडली. एकूण गझल छान.
"बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो " वाचून "कारवां गुजर गया, गुबार देखते रहे" आठवले.
तशी जुनी शब्दांची माझी ओळख आहे
पण अश्रूंना का त्या मी ओळखले नाही
- या शेराची दुसरी ओळ बदलून मी
'तशी जुनी शब्दांची माझी ओळख आहे
अर्थावाचून कधीच माझे अडले नाही'
बनवले व "आज अचानक.. "च्या शेराआधी बसवला.