सॅनफ्रान्सिस्कोत 'विश्व संमेलन'
८३
व्या अ.भा.
मराठी
साहित्य
संमेलनाऐवजी
आता 'पहिले
विश्व मराठी
साहित्य
संमेलन'
सॅनफ्रान्सिस्कोतील
बे
एरियामध्ये
१४, १५ व १६
फेब्रुवारी
२००९ रोजी
होणार आहे' अशी
घोषणा
गुरुवारी
सायंकाळी
करतानाच
साहित्य
महामंडळाचे
अध्यक्ष
कौतिकराव
ठाले-पाटील
यांनी
रत्नागिरीत
संमेलन
होणारच नाही,
असा
सोक्षमोक्ष
लावला.
'अखिल
भारतीय' ऐवजी
'विश्व'
साहित्य
संमेलनामुळे
'मराठी
साहित्याची
एक नवी परंपरा
निर्माण
होणार' तसेच
'महामंडळाच्या
या निर्णयाशी
विदर्भ
साहित्य
मंडळसुद्धा
सहमत आहे' असा
दावा ठाले
पाटील यांनी
पत्रकार
परिषदेत केला.
अखिल
भारतीय' ऐवजी
'विश्व'
साहित्य
संमेलनामुळे
'मराठी
साहित्याची
एक नवी परंपरा
निर्माण
होणार' असे महामंडळाला वाटते. तुम्हाला काय वाटते. तसेच नवी परंपरा निर्माण म्हणजे नक्की काय होणार?
जाता-जाता :
साहित्यसंमेलन.कॉम हे संकेतस्थळ आवर्जून बघावे. (हे साहित्यसंमेलनाचे अधिकृत संकेतस्थळ नाही.)